रुग्णांच्या सेवेसाठी तत्काळ अँबुलंस उपलब्ध व्हावी म्हणून आधी 108 हा टोल फ्री क्रमांक डायल करावा लागायचा, परंतु अधिक तत्पर सेवेसाठी हा क्रमांक बदलण्यात आला असून 104 हा टोल फ्री क्रमांक डायल करावा लागणार आहे. 1 नोव्हेंबर पासून हि सेवा साऱ्या महाराष्ट्रात सुरु होणार आहे. सरकारी रुग्णालयात गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते, त्या महत्वाच्या वेळी डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होवू नयेत म्हणून हा 104 टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. हि सुविधा देतांना ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असेल आणि त्याच्यामुळे गंभीर रुग्णाला उपचार मिळाले नसतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews